आनंदाची बातमी! राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 09:00 PM2020-09-26T21:00:43+5:302020-09-26T21:01:17+5:30

राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे

Good news! More than 10 lakh Corona patient cured from Corona in the Maharashtra state | आनंदाची बातमी! राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र

आनंदाची बातमी! राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र

Next

मुंबई - राज्यात उपचार सुरू असलेल्या (ॲक्टीव्ह) रुग्णांची संख्या झाली कमी राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर आले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून २० हजार ४१९ नवीन रुग्णांचे निदान झाले अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज निदान झालेले २०,४१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२८२ (४४), ठाणे- २५६ (३), ठाणे मनपा-४०१ (८), नवी  मुंबई मनपा-४०३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४०८ (२६), उल्हासनगर मनपा-४८, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१९७ (१०), पालघर-१६३ (२), वसई-विरार मनपा-२१० (१), रायगड-३१८ (६), पनवेल मनपा-२०० (१), नाशिक-४३५ (८), नाशिक मनपा-११६० (९), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-५२५ (६),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-२६, धुळे मनपा-२४, जळगाव-२३८ (९), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-७९, पुणे- १३९० (२३), पुणे मनपा-१७९६ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-११३८ (४), सोलापूर-६०१ (१५), सोलापूर मनपा-१०२ (३), सातारा-८४९ (२१), कोल्हापूर-४९५ (२२), कोल्हापूर मनपा-१८३ (५), सांगली-५२४ (२१), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५५ (७), सिंधुदूर्ग-९६ (२), रत्नागिरी-१४४ (५), औरंगाबाद-१४५ (२),औरंगाबाद मनपा-२४४ (६), जालना-८८ (१), हिंगोली-६७, परभणी-५८ (५), परभणी मनपा-३० (७), लातूर-११७ (२), लातूर मनपा-९७ (२), उस्मानाबाद-२२४ (११), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (२), नांदेड मनपा-२१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-७५, अमरावती-७० (१), अमरावती मनपा-१२८ (३), यवतमाळ-२८६ (७), बुलढाणा-२०२ (४), वाशिम-५७ (१), नागपूर-५१८ (४), नागपूर मनपा-१११७ (११), वर्धा-२६४ (५), भंडारा-१९२, गोंदिया-२५७, चंद्रपूर-१५५ (३), चंद्रपूर मनपा-१२९ (६), गडचिरोली-९०, इतर राज्य- ३० (५) असा आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३ लाख ६९ हजार ६७६ नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७४ टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६६ टक्के एवढा आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

 

फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

“कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”

Web Title: Good news! More than 10 lakh Corona patient cured from Corona in the Maharashtra state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.