मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मोडकसागर, तानसा धरण ओव्हरफ्लो
By Admin | Published: August 2, 2016 08:09 AM2016-08-02T08:09:31+5:302016-08-02T08:15:16+5:30
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. हे तलाव दुथडी भरुन वाहू लागल्यामुळे मुंबईकरांची पुढच्या वर्षभरासाठीची पाण्याची चिंता मिटली आहे.
रात्री अकराच्या सुमारास मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाला तर, मध्यरात्री तीनच्या सुमारास तानसा तलाव दुथडी भरुन वाहू लागल्याचे ठाणे महापालिकेला कळवण्यात आले. यापूर्वीच मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार, तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. सातपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मागच्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाणी कपात लागू करण्यात आली होती. अगदी अलीकडे चांगला पाऊस झाल्याने ही पाणी कपात रद्द करण्यात आली. मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणातून पाणी पुरवठा होतो.