व्यावसायिकांनो खुशशबर... आता रेल्वे स्थानकावर तुम्हाला करता येणार व्यवसाय
By Appasaheb.patil | Published: November 2, 2019 04:01 PM2019-11-02T16:01:50+5:302019-11-02T16:05:02+5:30
रेल्वेची योजना : जागा रेल्वेची... अन् व्यवसाय तुमचा ! सोलापूरकरांना मिळणार रेल्वेस्थानकावर व्यवसाय थाटण्याची संधी
सोलापूर : व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्न बºयाचदा विचारला जातो़ परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात़ आपल्या परिसरावर नजर फिरविली तर आपल्याला जी-जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते़ अशाच आपल्या कल्पनेतील व्यवसायाला आता रेल्वे प्रशासन संधी देणार आहे़ एवढेच नव्हे तर आपल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्नही करणार आहे़ सोलापुरातील जे-जे लोक व्यवसाय करू इच्छितात त्यांच्या व्यवसायासाठी रेल्वे प्रशासन स्थानकावर जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने नावीन्यपूर्ण कल्पना आणि संकल्पना योजनेंतर्गत व्यवसाय करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या धोरणाव्यतिरिक्त असणाºया कल्पनेला संधी देण्यात येणार आहे. ही योजना विभागीयस्तरावर आधारित आहे़ योजनेंतर्गत विभागीयस्तरावर प्रवाशांसंबंधित नवीन प्रस्ताव घेऊन येणाºया एजन्सी/फर्म अथवा व्यक्तींनी सविस्तर माहिती, लागणारी जागा आणि वार्षिक रेल्वे प्रशासनाला किती लायसन्स फी भरण्यास तयार आहे अशा प्रत्येक प्रस्तावासह एक हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. या योजनेंतर्गत एक वर्षाकरिता ठेका देण्यात येत आहे़ एवढेच नव्हे तर आपला व्यवसाय सुरळीत सुरू असेल तर एक वर्ष मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
गेम झोन आदी कल्पनांना दिली संधी...
- या उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वेच्या इतर विभागामध्ये मार्केटिंंग कियोस्क, गेम झोन, मसाज मशीन, नावीन्यपूर्ण पब्लिसिटी प्रकार, ब्रँडिंग आदी प्रकारच्या कल्पनांना सध्या रेल्वे प्रशासनाने संधी दिली आहे. या उपक्रमामुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे़ त्यामुळे रेल्वेला अधिकाधिक सेवा-सुविधा प्रवाशांना देण्यासाठी तत्पर पावले उचलण्यात येणार असल्याचेही रेल्वे अधिकाºयांनी सांगितले़
भारतीय रेल्वे मंत्रालयाने नावीन्यपूर्ण कल्पना आणि संकल्पना योजनेंतर्गत सोलापूर विभागातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे़ ज्या व्यावसायिकांच्या मनात असलेल्या कल्पनांना वाव मिळवून घ्यावयाचा आहे त्यांनी रेल्वेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे़ या योजनेच्या अधिक माहितीसाठी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक कार्यालय, सोलापूर येथे संपर्क करावा़
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग़