गुडन्यूज! कोरोना रुग्णसंख्या अन् मृत्युदरातही घट; लोकांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:44 AM2023-05-01T06:44:16+5:302023-05-01T06:44:32+5:30
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युदरात घसरण झाली आहे
मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत या आठवड्यात घट झाली असून, जिल्ह्यांत चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांचा दरही कमी झाला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांना यश येत असून, या आठवड्यात मृत्यूदर ०.३६ वरून घट होत ०.२६ झाला आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे...
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युदरात घसरण झाली आहे. राज्यातील प्रयोगशाळांकडून आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कोरोना बाधितांचा दर ६.३ होता. या आठवड्यात ४.३ आहे. या आठवड्याचा मृत्युदर ०.२६ कमी झाला आहे; जो गेल्या आठवड्यात ०.३६ होता. कोरोना चाचण्या तपासणीमध्ये या आठवड्यात दररोज सरासरी १४ हजार ५०० तपासण्या केल्या जात आहेत.