महिलांसाठी खुशखबर; देशसेवेचे स्वप्न पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:05 AM2019-04-25T10:05:10+5:302019-04-25T10:22:02+5:30

जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती.

Good news for women; The process of recruitment in the military started | महिलांसाठी खुशखबर; देशसेवेचे स्वप्न पूर्ण होणार

महिलांसाठी खुशखबर; देशसेवेचे स्वप्न पूर्ण होणार

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलात आता रणरागिनी आपले शौर्य दाखवू शकणार आहेत. पहिल्यांदाच भारतीय सैन्यात सैनिकम्हणून महिलांची भरती होणार आहे. यासाठी भरती प्रक्रियाही ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. 


जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. यानुसार ही भरती आयोजित करण्यात आली असून आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
 महिलांसाठी वेगळी बटालियन असण्याची शक्यता आहे. महिला लष्करी पोलीस असे या पदाचे नाव आहे. यापूर्वी 1992 पासून केवळ अधिकारी पदावरच महिलांची भरती करण्यात येत होती. आता जवानांच्या समकक्ष पदावर 100 जागांवर महिलांची भरती करण्यात येणार आहे. 


भरतीसाठी अटीं आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांचे शिक्षण कमीतकमी 10 वी पास, वय 17 ते 21, उंची 142 सेमी असायला हवी. तसेच महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत, विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशा महिलाच अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्रच लिहून द्यावे लागणार आहेत. 


अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा...

 

Web Title: Good news for women; The process of recruitment in the military started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.