राज्यात चांगला पाऊस, रोगराईचं संकट कमी; काय म्हटलंय भेंडवडच्या भविष्यवाणीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:20 AM2022-05-04T10:20:47+5:302022-05-04T10:29:56+5:30

शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात.

Good rains in the state, reduced disease crisis; What does the bhendval prediction say? | राज्यात चांगला पाऊस, रोगराईचं संकट कमी; काय म्हटलंय भेंडवडच्या भविष्यवाणीत?

राज्यात चांगला पाऊस, रोगराईचं संकट कमी; काय म्हटलंय भेंडवडच्या भविष्यवाणीत?

Next

बुलढाणा - राज्यभरातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचे लक्ष लागून असलेल्या भेंडवडच्या घट मांडणीचे भाकित अखेर आज बुधवारी जाहीर झाले. ३५० वर्षांहून अधिक अशा भेंडवडच्या भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवड घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. 

देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे. सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवडच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. या भेंडवडच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवडच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला ३५० वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी  हे भाकित सांगितलं जातं. ३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे.

शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे. जून आणि जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईल विशेष म्हणजे अवकाळी पाऊस ही राहणार आहे. तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे असं वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत केले आहे.  

त्याचसोबत मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे. तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील. भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील. साडी म्हणजे तांदळाचे साधारण चांगले असेल. कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Good rains in the state, reduced disease crisis; What does the bhendval prediction say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.