गुजरातचे खैर तस्कर थेट मालेगावमध्ये; इलेक्ट्रिक कटरने कापले ४०० वृक्ष,२७हजार हेक्टरच्या जंगलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 04:18 PM2017-10-09T16:18:45+5:302017-10-09T16:57:10+5:30

मुख्य वनसंरक्षकांचे नियंत्रण असलेल्या मालेगाव उपवन विभागात मागील चार महिन्यांपासून सातत्याने खैराची तोड क रणारी टोळी सक्रिय आहे. त्यांना अटकाव करण्यास वनविभागाला अपयश आले. गुजरात, दिल्लीमधील गुटखा व्यवसायासाठी खैराची मोठी मागणी.

Good smuggler of Gujarat directly in Malegaon; 400 trees cut by electric cutter, 27 hectares forest risk | गुजरातचे खैर तस्कर थेट मालेगावमध्ये; इलेक्ट्रिक कटरने कापले ४०० वृक्ष,२७हजार हेक्टरच्या जंगलाला धोका

गुजरातचे खैर तस्कर थेट मालेगावमध्ये; इलेक्ट्रिक कटरने कापले ४०० वृक्ष,२७हजार हेक्टरच्या जंगलाला धोका

Next
ठळक मुद्दे गाळणा-चिंचवा या परिसरातील सुमारे तीस हजार हेक्टरवर पसरलेल्या जंगलातील खैरची लहान-मोठी झाडे ऊस कापावा अशी इलेक्ट्रीक कटरने जमिनीपासून कापून टाकत बुंधे लंपासमालेगावपासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या चिंचवा, गाळणा, पोहाणे या गावांच्या वनक्षेत्रात झालेली खैरची कत्तलीमागे गुजरात कनेक्शन असण्याची शक्यता आहे

नाशिक : नाशिक वनवृत्तामधील मालेगाव या उपवनविभागाच्या हद्दीमधील गाळणा, नागझरी-शितेवाडी वनक्षेत्रावर खैर तस्कर टोळीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचे उघडकीस आले. येथील सुमारे तीनशेहून अधिक खैरची झाडे या टोळीने कापून नेल्याने संताप व्यक्त होत आहे. मालेगाव उपविभागाच्या वन खात्याचा निष्क ाळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्टÑ-गुजरात सीमेवरील नाशिकच्या आदिवासी भागातील जंगलात धुमाकूळ घालणारी खैर तस्करांच्या टोळीचे हात थेट मालेगावच्या वनहद्दीपर्यंत येऊन पोहचल्याने धोका वाढला असून, वनविभागापुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे.


मालेगाव उपवनविभाग हे स्वतंत्र कार्यक्षेत्र असून, यासाठी स्वतंत्र सहायक वनसंरक्षकांची नियुक्ती नाशिक वनवृत्त विभागाच्या अखत्यारितीत करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षकांचे नियंत्रण असलेल्या या उपवन विभागात मागील चार महिन्यांपासून सातत्याने खैराची तोड क रणारी टोळी सक्रिय आहे. त्यांना अटकाव करण्यास वनविभागाला अपयश आले. गुजरात, दिल्लीमधील गुटखा व्यवसायासाठी खैराची मोठी मागणी असल्यामुळे महाराष्टÑातील वनसंपदेवर वक्रदृष्टी तस्कारांनी केली आहे. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ तालुक्यातही खैर तस्करीचे साम्राज्य पसरले असून, हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक पूर्व वनविभागाच्या अधिकाºयांकडून प्रयत्न सुरू असताना तस्करांचे हात थेट महराष्टÑ-गुजरात सीमेवरून नाशिकच्या मालेगाव तालुक्यापर्यंत येऊन पोहचल्याने जंगलांची सुरक्षितता विशेषत: खैरची झाडे धोक्यात आली आहेत. गाळणा-चिंचवा या परिसरातील सुमारे तीस हजार हेक्टरवर पसरलेल्या जंगलातील खैरची लहान-मोठी झाडे ऊस कापावा अशी इलेक्ट्रीक कटरने जमिनीपासून कापून टाकत बुंधे लंपास केल्याचे दक्षता पथकाच्या पंचनाम्यात समोर आले आहे.


गुजरातच्या तस्करांशी ‘कनेक्शन’
मालेगावपासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या चिंचवा, गाळणा, पोहाणे या गावांच्या वनक्षेत्रात झालेली खैरची कत्तलीमागे गुजरात कनेक्शन असण्याची शक्यता आहे. गुजरातच्या तस्कर टोळ्यांनी गावातील काही स्थानिकांना प्रलोभन दाखवून त्यांची मदत घेत जंगलात घुसखोरी करून थेट इलेक्ट्रिक कटरने खैरची झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे.

Web Title: Good smuggler of Gujarat directly in Malegaon; 400 trees cut by electric cutter, 27 hectares forest risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.