गुगल फिरवू शकते निवडणुकीचा निकाल - सर्वे
By admin | Published: May 13, 2014 05:32 PM2014-05-13T17:32:12+5:302014-05-13T17:32:12+5:30
भारतात अनेक मतदार हे गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याने त्यांना कोणाकडे वळवायचे याची ताकत गुगलमध्ये आहे.
Next
>ऑनलाइन टीम
वॉशिग्टंन, दि. १३ - भारतात अनेक मतदार हे गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याने त्यांना कोणाकडे वळवायचे याची ताकत गुगलमध्ये आहे असे सांगत निवडणुकीचा निकाल गुगल फिरवू शकते असे अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील रिसर्च सायक्लोजिस्ट अमेरिकन इन्स्टिट्यूटने केलेल्या एका सर्वेत म्हटले आहे.
रिसर्च एन्ड टेक्नोलॉजी कॅलिफोर्नियातील वरिष्ठ संशोधक डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वे करण्यात आला असून हा सर्व प्रकार म्हणजे भारतातील लोकशाहीसाठी मोठा संवेदनशील विषय असल्याचे डॉ. रॉबर्ट यांनी सांगितले. गुगलवर सर्वाधिक रॅकिंग असणा-या व्यक्तीवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. म्हणूनच कंपन्याही उत्पादनाचे रॅकिंग वाढविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करतात, असे सर्वेमध्ये म्हटले आहे.
गुगलमध्ये सर्वाधीक सर्च केलेल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांची रॅकिंग अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यास केजरीवाल यांच्याकडे मतदार वळू शकतो असा या सर्वेमध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे. मतदान कोणाला करायचे याविषयी संभ्रमात असलेल्या जवळपास १५ टक्के पेक्षाही अधिक मतदार अन्य उमेदवारांकडे आकर्षित झाले होते असे गेल्यावर्षी अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये स्पष्ट झाल्याचे डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांनी म्हटले आहे. तर भारतामध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये अशाच पध्दतीने २ हजार मतदारांना दुस-या उमेदवारांकडे वळविण्यात यश आले होते. तसेच काही मतदारांना दुप्पट पैसे दिल्यानंतर त्यांचे मतदान अन्य उमेदवारांकडे फिरविण्यात यश आल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे. ३५ वर्षे वय पार केलेल्या १९ टक्के महिला या सहज आपले अमूल्य मत गुगलवरील माहितीच्या आणि छायाचित्राच्या आधारे फिरवू शकतात तसेच १८ टक्के अशिक्षित लोक आपले मत सहज फिरवितात असे या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. आम्ही केलेल्या वैयक्तिक सर्वेमध्ये ९९ टक्के लोकांचा कल गुगलवरील माहितीवरून वेगळया उमेदवारांच्या बाजुने जावू शकतो असे सर्वेक्षणात आढळून आल्याचे डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांनी सांगितले.