गुगलवर भारतातून घेण्यात येणारा १० पैकी १ सर्च भारतीय चित्रपटांचा
By Admin | Published: June 17, 2016 05:36 PM2016-06-17T17:36:16+5:302016-06-17T17:36:16+5:30
आज भारतीय सिनेमा चाहते गुगल वर वेगवेगळ्या प्रकरची माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री, किवा त्यांची कुटुंबियांची माहिती शोधताना दिसतो.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : भारतीयांना असलेल्या चित्रपटाच्या वेडामुळे भारतीय सिने रसिकांना इमर्सिव (गुंगवून टाकणारा) अनुभव देण्यासाठी गुगल इंडिया ने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. गुगल आपल्याला भारतीय सिनेमाविषयी हवी असलेली इत्यंभूत माहिती पुरवतो. गेल्या अनेक वर्षात भारतीय सिनेमाविषयी गुगल वर विविध प्रकारची माहिती सर्च केली जाते. मग आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री, गाणी, सिनेमासंबंधी किस्से, किंवा मग सिनेमाच्या प्रदर्श्नासाबंधी माहिती असो, ही सर्व महती आपण गुगल वर एका क्लिक वर मिळवत होतो. आता तर गुगलने आपली शोध मोहीम गुगल स्पीक द्वारे अगदीच सोपी केली आहे.
नुकतेच मुंबईतील ताज लॅण्ड एन्ड मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गुगलने भारतीय सिनेमासाठी केल्या जाणाऱ्या सर्च सबंधी आपले अनुभव व्यक्त केले. त्यांनी आपल्या एका नवीन पण हटके फिचरची ओळख करून दिली. या फिचरच्या साह्याने आपल्याला गुगल वर सर्च करताना शब्द लिहिण्याची (टायपिंग) करण्याची गरज भासणार नाही, तुमच्या आवाजाने तुम्ही गुगल वर हवं ते सर्च करू शकाल अशी नवीन ह्णगुगल स्पीकह्णची ओळख. या सर्च माध्यमातून भारतीय चित्रपटांना मानवंदना देणारा व्हिडिओ या वेळी प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये आपल्या एक मराठी चेहरा नंदू माधव यांचा दिसतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी आपल्या विशिष्ट शैली मध्ये केले.
आज भारतीय सिनेमा चाहते गुगल वर वेगवेगळ्या प्रकरची माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री, किवा त्यांची कुटुंबियांची माहिती शोधताना दिसतो. गुगलवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मिळून जेवढ गुगल वर सर्च केलं जात त्याहून अधिक अभिनेता सलमान खान याच्यासाठी गुगल सर्च अधिक केले जातात. अशी माहिती गुगलच्या राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक सपना चढ्ढा यांनी दिली. या वेळी गुगलचे उत्पादन व्यवस्थापक सत्यजित सलगर हे देखील उपस्थित होते.