गुगल देणार मराठीला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:35 AM2018-06-12T03:35:52+5:302018-06-12T03:35:52+5:30
मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे.
पुणे : मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. इंटरनेटमार्फत आपले साहित्य आणि पुस्तके पोहोचवू पाहणाऱ्या लेखक आणि प्रकाशकांना गुगलतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी ‘गुगल सर्च संमेलन’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून येत्या २२ जून रोजी गुगलतर्फे पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीसाठी आवश्यक गुगलच्या विविध फीचर्ससंदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाईल.
या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, नोंदणीत दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेत सहभागी होणाºया सदस्यांची निवड गुगलच्या टीमकडून केली जाणार आहे. ँ३३स्र२://ॅङ्मङ्म.ॅ’/ऋ२ु९४४ या लिंकवर कार्यशाळेचा नोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या सदस्यांना ई-मेलद्वारे कार्यशाळेची माहिती कळवली जाईल.
‘गुगल सर्च संमेलन’ या उपक्रमांतर्गत हिंदीसह मराठी, तमीळ, तेलुगू आणि बंगाली या चार प्रादेशिक भाषांमधील लेखक, प्रकाशक, ब्लॉग लेखक, प्रादेशिक भाषांत वेबसाइटची निर्मिती करणारे डेव्हलपर; तसेच मराठीशी संबंधित व्यावसायिक यांच्याशी गुगल संवाद साधणार आहे. गुगलने उपलब्ध केलेल्या फीचर्सचा वापर कसा करावा, याबाबतसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी भाषेमधील साहित्य इंटरनेटवरील वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायला हवे, यासाठी ‘गुगल’तर्फे सहकार्य करण्यात येणार आहे.