गुगलने घेतला मोदींचा धसका

By admin | Published: May 10, 2016 04:03 AM2016-05-10T04:03:42+5:302016-05-10T04:04:44+5:30

भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

Google takes control of Modi | गुगलने घेतला मोदींचा धसका

गुगलने घेतला मोदींचा धसका

Next

गौरीशंकर घाळे, मुंबई
भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. वर्षानुवर्षे जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला विविदीत भूमी म्हणून रेखाटणा-या गुगल मॅपने सुधारणा केली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशात आता ही दोन्ही राज्ये भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात येत आहेत.
अलीकडेचे केंद्रातील मोदी सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केले. या विधेयकानुसार भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासासह १०० कोटी पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारताचे चुकीचे नकाशे प्रसारीत होत आहेत. यात भारताच्या आंतराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आल्या. भारतीय नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवून त्यांचा विवादीत क्षेत्र असा उल्लेख करण्यात येत असे. हे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल आणले. या बिलातील कठोर तरतूदीचा धसका घेत गुगल मॅपने आपली चूक सुधारली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशातील तुटक रेषा काढण्यात आल्या असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात आला आहे.


लवकरच जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल संसदेत मांडण्यात येणार आहे. यानुसार भारतीय नकाशात बदल वा फेरफार करायचा असल्यास सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या विधेयकात परवान्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सॅटलाइट, एअरक्राफ्ट, एअरशिप, बलून माध्यमातून चुकीचा नकाशा दाखवता येणार नाही.
>काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या नकाशात काश्मीर चीनचा भाग तर जम्मू पाकिस्तानात असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावेळी केंद्र सरकारने नकाशात सुधारणा केली होती.
मायक्रोसॉफ्ट, गुगल व इतर अमेरिकी कंपन्या सर्रास भारताच्या नकाशात फेरफार करत चुकीचा नकाशा पसरवित असल्याचा आरोप होत असतो. मायक्रोसॉफ्ट तसेच गुगलच्या वेबसाइटवर संपूर्ण काश्मीर पाकिस्तानमध्ये तर अक्साई चीन हा भारताचा भूभाग चीनमध्ये दाखविला जायचा.
वारंवार चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल अलीकडेच अल जझिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीचे भारतातील प्रक्षेपण पाच दिवसांसाठी थांबविण्यात आले होते. तर भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने गुगल मॅप्सविरोधात गेल्या डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Google takes control of Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.