गुगलची जामिनी रॉय यांना डुडलच्या माध्यमातून आदरांजली !

By admin | Published: April 11, 2017 08:30 AM2017-04-11T08:30:21+5:302017-04-11T08:30:21+5:30

जगविख्यात असलेले भारताचे महान चित्रकार जामिनी रॉय यांनाही गुगलनं डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

Google's Jamini Roy to be respected by Doodle! | गुगलची जामिनी रॉय यांना डुडलच्या माध्यमातून आदरांजली !

गुगलची जामिनी रॉय यांना डुडलच्या माध्यमातून आदरांजली !

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - इंटरनेटच्या महाजालात सर्वाधिक वरचं स्थान हे सर्च इंजिन असलेल्या गुगलला दिलं जातं. अनेकदा गुगल देशभरातील मान्यवर आणि नावाजलेल्या व्यक्तींना त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त डुडलच्या माध्यमातून मानवंदना देत असतो. जगविख्यात असलेले भारताचे महान चित्रकार जामिनी रॉय यांनाही गुगलनं डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

चित्रकार जामिनी रॉय यांची आज 130वी जयंती असून, याच पार्श्वभूमीवर गुगलने जामिनी रॉय यांनी कलेतून साकारलेल्या चित्राचं डुडल तयार केलं आहे. त्याद्वारे त्यांनी त्यांच्या कार्याला एक प्रकारे मानवंदना दिली आहे. 20व्या शतकातील भारतीय चित्रकारांमध्ये जामिनी रॉय यांचं नाव अव्वल स्थानी आहे. देशाच्या सीमा पार करून जगभरात स्वतःच्या कलेचा जागर करणा-या चित्रकारांमधील रॉय हे एक आहेत.

भारत सरकारने 1955साली त्यांच्या या कलेचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला होता. पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्यातील बोलियातोर इथल्या एका गावात जामिनी रॉय यांचा 11 एप्रिल 1887साली जन्म झाला. 1903 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचं शिक्षण घेतलं. ग्रामीण जीवन जवळून पाहिलेल्या रॉय यांनी त्यांच्या चित्रांमध्येही त्यांचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. वयाच्या 85व्या वर्षी 24 एप्रिल 1972 रोजी जामिनी रॉय यांचं निधन झालं. जामिनी रॉय यांचं डुडल करून गुगलने एका महान चित्रकाराला त्याच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

Web Title: Google's Jamini Roy to be respected by Doodle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.