शेळके खून प्रकरण; २० जणांवर मोक्का
By admin | Published: November 7, 2016 01:00 AM2016-11-07T01:00:51+5:302016-11-07T01:00:51+5:30
माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणी २० आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
तळेगाव दाभाडे : माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणी २० आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी १६ आॅक्टोबरला सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली.
शेळके खून प्रकरणातील २० पैकी १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर तीन आरोपी पोलीस कोठडी भोगत आहेत. सात आरोपी फरारी असून, पोलीस त्यांचा कसूून शोध घेत आहेत.
रुपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. कालेकॉलनी, पवनानगर, ता. मावळ) , सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई, ता. मावळ) या पाच आरोपींची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपल्याने त्यांना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत.
बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), संदीप सोपान पचपिंड(वय ३०. रा. आंबी, ता. मावळ),खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड ( वय ३०, रा. माळवाडी, ता. मावळ), आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा. जोशीवाडा, तळेगाव स्टेशन, ता. मावळ), दत्तात्रय ज्ञानेश्वर वाघोले (वय २८ रा. ठाकरवाडी, इंदोरी) यांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (वय ३३ रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), सूरज विलास गायकवाड (वय २२, रा. ठाकरवाडी,
इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर (वय २२, रा. भांबोली, ता. खेड) या तीन आरोपींची पोलीस कोठडी ८ नोव्हेंबरपर्यंत आहे.
शेळके खून प्रकरणातील श्याम रामचंद्र दाभाडे (रा. कोटेश्वरवाडी ,ता. मावळ), धनंजय प्रकाश शिंदे ऊर्फ तांबोळी (रा. वारंगवाडी, ता. मावळ), देवानंद ऊर्फ देविदास विश्वनाथ
खर्डे (रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन), अजय राजाराम हिंगे (रा. पिंपळखुटे, ता. मावळ) व इतर आरोपी अद्याप फरारी आहेत.
वरील २० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची
माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर दिली. (वार्ताहर)