स.गो.पाचपोळांची ‘माय’ अभ्यासक्रमात समाविष्ट !
By Admin | Published: April 26, 2016 02:09 AM2016-04-26T02:09:04+5:302016-04-26T02:09:04+5:30
अखेर मिळाला न्याय; बुलडाणेकरांनी केला होता पाठपुरावा.
बुलडाणा : 'हंबरून वासराले चाटते जवा गाय..' ही स.गो.पाचपोळांची प्रसिद्ध कविता सहावीच्या मराठी पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील स. ग. पाचपोळ हे प्रतिभावंत कवी असले, तरी प्रसिद्धीपराड:मुख असल्याने त्यांच्या कवितांना प्रसिद्धीचे गोंदण मिळाले नाही. औरंगाबादच्या पैठणी प्रकाशनाने ह्यमराठी काव्य परिमलह्ण या नावाने प्रातिनिधिक स्वरूपात काही कवींच्या कवितांचा संग्रह १९८७ साली प्रकाशित केला होता, त्यामध्ये पाचपोळांची ह्यमायह्ण ही कविता सर्वप्रथम प्रकाशित झाली होती. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक मंडळाने या कवितेची दखल घेऊन येणार्या शैक्षकिण वर्षात सहाव्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात ही कविता समाविष्ट करून स.ग.पाचपोळांच्या प्रतिभेचा गौरव केला आहे. ही मुळ कविता नऊ कडव्यांची असून सहावीच्या पुस्तकात यामधील सात कडवे समाविष्ट केले आहेत.
'लोकमत'चा पाठपुरावा !
२0११ मध्ये ही कविता प्रख्यात कलावंत जितेंद्र जोशी यांनी मुंबई पोलीसांच्या कार्यक्रमात सादर केली. त्यावेळी त्यांनी नारायण सुर्वे हे या या कवितेचे कवी असून, मुळ कविता हिंदीमध्ये असल्याचे जाहिर केले होते. ही कविता त्यानंतर प्रचंड लोकप्रिय झाली; मात्र मुळ कवी दिवंगत पाचपोळ यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला होता. त्यामुळे बुलडाणा येथील साहित्य वतरुळात खळबळ उडाली होती. येथील उपक्रमशिल ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी या कवितेच्या कवीचा शोध घेतला व 'लोकमत' ने ही बाब सर्वप्रथम प्रकाशित करून ही कविता स.गो. पाचपोळांची असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले होते हे विशेष !