Gopichand Padalkar Mother: गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच! पडळकरवाडीत दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:52 PM2022-12-20T12:52:39+5:302022-12-20T12:53:43+5:30
Aatpadi Gram Panchayat Election Result: आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे.
सांगली-
Aatpadi Gram Panchayat Election Result: आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्येही सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती. यात हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत.
बाजी पालटली! भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे, ठाकरे गट पाचवर फेकला गेला
पडळकरवाडीमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक देखील पार पडली होती. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. पण तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्यानं पडळकरवाडीतही सरपंच पदासाठीही निवडणूक लागली. गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर विराजमान झाल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम