गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ, त्याने बारामतीतून लढावं; CM नी ठरवूनच टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:53 PM2019-09-30T13:53:52+5:302019-09-30T14:27:22+5:30

'वंचितमध्ये गेल्यावर दु:ख झाले होते'

Gopichand Padalkar will fight against ajit pawar from Baramati; CM decided! | गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ, त्याने बारामतीतून लढावं; CM नी ठरवूनच टाकलं!

गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ, त्याने बारामतीतून लढावं; CM नी ठरवूनच टाकलं!

Next

मुंबई : वंचिचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी घरवापसी केली केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ असून त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवावी, असे सांगत एकप्रकारे भाजपाकडून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. 

मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकर यांचे तोंडभरुन कौतुक केले. आपल्या सर्वांचे लाडके आणि माझेही लाडके गोपीचंद पडळकर पुन्हा घराकडे परत आले आहेत. ते वंचितमध्ये गेल्यावर दु:ख झाले होते. कोणतीही राजकीय मागणी न करता फक्त धनगर समाजासाठी व्रत स्वीकारले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

याचबरोबर, गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना बारामतीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्त्वाशी बोलणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का देत महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी गोपीचंद पडळकर यांनी केली होती. ही माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती. 

Web Title: Gopichand Padalkar will fight against ajit pawar from Baramati; CM decided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.