अमित शाह यांच्या हस्ते गोपीनाथ गडाचे लोकार्पण
By admin | Published: December 12, 2015 01:19 PM2015-12-12T13:19:25+5:302015-12-12T13:36:37+5:30
बीड जिल्ह्यातील परळी येथे अठरा एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गड या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १२ - बीड जिल्ह्यातील परळी येथे अठरा एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गड या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मुंडे यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुंडे यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात हे प्रेरणास्थळ उभारण्यात आले आहे. प्रज्ञा गोपीनाथ मुंडे तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे व यशःश्री मुंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
गोपीनाथ गड या नावाने हे प्रेरणास्थळ उभारण्यात आले आहे. लोटस टेंपल नावाने मुंडे यांचे समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. कमळाप्रमाणे त्याची प्रतिकृती साकारली असून ७२ फुट उंच आणि १११ फुट अष्टकोनी घेर असलेले हे कमळाचे फुल पाहणा-याचे लक्ष वेधून घेत आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा २२ फूट उंचीचा पंचधातूचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची दहा फूट आहे.