CM Uddhav Thackeray: गोपीनाथ मुंडेंची विनंती अन् बाळासाहेबांचा आदेश; उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:29 PM2022-06-08T21:29:27+5:302022-06-08T21:32:14+5:30
बाळासाहेब कागदावर कधी आकडेमोड करत नव्हते, तुझे नगरसेवक किती, अपक्ष किती? एका क्षणात निर्णय घेतला असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
औरंगाबाद - सरकार येऊन अडीच वर्ष झाली. रोज स्वप्न मी पुन्हा येणार म्हणून पडतायेत. महाराष्ट्र पुढे नेणारी ही अडीच वर्षे तुमच्या आशिर्वादाने, प्रेमाने विश्वासाने झाली. ज्यांच्यासोबत भांडलो ते मित्र झाले आणि मित्र होते ते हाडवैरी झाले. एक काळ संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना भाजपा अस्पृश्य होते. पण २५-३० वर्ष आमचा उपयोग केला नंतर सत्ता आल्यानंतर शिवसेना तुम्हाला डोळ्यात खुपायला लागली. काढा यादी अटलजी आले तेव्हा किती होते आज किती आहेत. ? इतकी वर्ष तुम्हाला ज्यांनी जपलं, जोपासले आणि मोठे केले त्यांच्याच अंगावर आलात अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला.
औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीगोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगितला, ते म्हणाले की, एक दिवस गोपिनाथजी घरी आले, औरंगाबादमध्ये भाजपाचा महापौर असावा ही विनंती केली. बाळासाहेबांनी त्यांची विनंती एका क्षणात मान्य करत भाजपाचा महापौर होईल असं सांगितले. बाळासाहेब कागदावर कधी आकडेमोड करत नव्हते, तुझे नगरसेवक किती, अपक्ष किती? एका क्षणात निर्णय घेतला आणि भाजपाचा महापौर बनवला. गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दावर बाळासाहेबांनी औरंगाबादेत भाजपाचा महापौर दिला. औरंगाबाद महापालिकेत भागवत कराड महापौर झाले आज ते वर गेलेत. वर म्हणजे केंद्रात गेलेत असं उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) सांगितले.
भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका
तसेच भाजपा प्रवक्त्यांच्या वाचाळपणामुळे देशाची अब्रु गेली. तुम्ही ज्या दिशेने जात आहात कुठे नेऊन ठेवणार आहात माझा हिंदुस्थान? शिवसेना बदनाम होऊ शकत नाही. कुठल्याही आपत्तीत रक्तदान करायचा असेल तर शिवसैनिकांच्या रांगा लागतात. शिवसेनेची पाळमुळे खोलवर रुजली आहेत. कितीही आदळआपट केली तरी शिवसेना संपवू शकत नाही. शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत म्हणून तुमच्यासमोर येऊ शकतो. आमच्या हिंदुत्वाची मापं काढू नका. ह्दयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गदाधारी नाही. आजच्या सभेत भाड्याने आणलेली लोक आहेत का? वज्रमूठ करून दाखवून द्या. जो देशासाठी मरायला तयार आहे तो आमचाच आहे. त्याचे रक्षण करणे हे आमचे हिंदुत्व आहे. तुमच्या दर्शनाने माझ्यामध्ये लाखो हत्तीचं बळ आलेले आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
नाव बदलायला आता बदलू शकतो, पण...; औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरे संतापले
कंत्राटदारांना तुरुंगात टाका
हिंदुत्व आपला श्वास ह्याच मैदानात शिवसेनाप्रमुख बोलले. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जुनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या असं अधिकाऱ्यांना सांगितले. जुन्या समांतर योजनेला पैसे देणार आहे. आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका