गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही

By admin | Published: July 3, 2017 04:57 AM2017-07-03T04:57:40+5:302017-07-03T04:57:40+5:30

गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या

Gorkha is not just a religious issue | गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही

गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. गोरक्ष केवळ धार्मिक मुद्दा नाही, तर त्याला वैज्ञानिक आधारही आहे, याचे भान घटनाकारांना होते, म्हणूनच घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश करण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत षण्मुखानंद सभागृहात जैन इंटरनॅशनल आॅर्गनायजेशन (जिओ)च्या वतीने आयोजित ‘मेगा बिजनेस जिओ कॉन्फरन्स’मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर परमपूज्य गणीवर्य नयपद्मसागर महाराज, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, चित्रपट निर्माते आनंद रॉय आदींसह देशाभरात विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पूज्य नयपद्मसागर महाराज धर्माची सेवा तर करतातच, तसेच सामाजिक कार्यातही ते आघाडीवर असतात. महाराष्ट्रातील १७ हजार खेड्यांमध्ये महाराजांच्या प्रेरणेने जलसिंचनाची कामे सुरू आहेत. जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही ते पुढे आहेत. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी, सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. देशाचा जीडीपी वाढविणारा आणि सर्वाधिक कर भरणारा समाज म्हणूनही जैन समाजाची ओळख आहे.’
नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एक देश एक कर’ यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. युरोपातील विविध देशांमध्ये सीमेवरून झगडा चालू असतो, पण याच युरोपीयन देशांनी आर्थिक आघाडीवर मात्र, एकच बाजारपेठ आणि करप्रणाली लागू केली. सव्वा करोड भारतीयांची ताकद ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीत नयपद्मसागर महाराजांच्या आशीर्वादानेच चमत्कार घडला. प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारासाठी त्यांचे आशीर्वाद होते. त्यांच्या आशीर्वादाने आमची जबाबदारी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार असल्याचे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले.
गुजरातमध्ये पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात पक्षी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे रूपानी यांनी सांगितले.
तर, जीएसटीमुळे सामान्य माणसाला फायदा होणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. जीएसटी भरताना, ३६ रिटर्न भरावे लागणार असल्याची तक्रार अनेक जण करतात. प्रत्यक्षात फक्त १२ रिटर्नच भरावे लागणार आहेत. सुरुवातीच्या काळात जीएसटी भरताना अनवधानाने काही चुका झाल्या, तर दुर्लक्ष करण्याचे सरकारचे धोरण आहे, पण जाणूनबुजून चुका केल्या, तर मात्र त्याला शिक्षा होईल. जीएसटी पूर्वीचे कायद्यांमुळे करचोरी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. जीएसटीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यासाठीच जीएसटी लागू करण्यात आल्याचे मेघवाल म्हणाले.

पुरस्कारांचे वितरण

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रूपानी यांच्या हस्ते ‘जिओ भामाशाह सन्मान’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिओ भामाशाह पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला.
जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या ‘श्रमणी विहारम’ यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची या वेळी घोषणा करण्यात आली.
पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे विजय रूपानी यांनी सांगितले.

Web Title: Gorkha is not just a religious issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.