‘गोसेखुर्द’ अधांतरीच
By admin | Published: August 6, 2015 01:04 AM2015-08-06T01:04:40+5:302015-08-06T01:04:40+5:30
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.
नंदू परसावार, भंडारा
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे.
गोसेखुर्दला केंद्र सरकारच्या एआयबीपीअंतर्गत (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) २००९मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. सोबतच निधी देऊन प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला होता. मात्र वर्षामागून वर्षे लोटली, परंतु पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे कामही अपूर्णावस्थेत आहे. कालवा बांधकामात अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी अद्याप सुरूच असल्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीत अडचणी येत आहेत.
प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात
३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित होतात. यात पूर्णत: बाधित
३४ पैकी २८ गावांचे तीन टप्प्यांत विविध ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १७ गावांचे पुनर्वसन करायचे होते. परंतु
यापैकी सहा गावांचे पुनर्वसन
न झाल्याने जलस्तर वाढविण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्या
टप्प्यात १२ पैकी दोनच गावांचे पुनर्वसन झाले आहे.