दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

By admin | Published: March 10, 2016 03:55 AM2016-03-10T03:55:44+5:302016-03-10T03:55:44+5:30

राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल

Governance committed to redress drought - Governor | दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

Next

मुंबई : राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आजअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणात सांगितले.
राज्यातील पाच महसूल विभागांना जोडणारा नागपूर-मुंबई अतिजलद दळणवळण द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम यंदा हाती घेण्यात येणार असून जो देशातील सर्वात लांब हरितक्षेत्र द्रुतगती महामार्ग असेल. सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे चक्र ाकार मार्गाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल.
ठाणे खाडीवरील पुलाचे बांधकामसुद्धा सुरु करण्यात येईल. तसेच, खोपोली पथकर नाका ते कुसगावच्या दरम्यान सुमारे ८.२ किलोमीटरचा बोगदा आणि ४किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.
ठाणे-घोडबंदर रोड, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपूल, वाकण-पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग आणि कल्याण-डोंबिवली-शिळफाटा उन्नत मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने ३ हजार ४९ कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे. पीककर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ केले आहे. पीक कर्जाची पुनर्रचना करण्यात आली. कर्जावरील व्याज माफ करून कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्धा-सेवाग्राम-पवनारचा विकास करणार. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याशी निगिडत पाच ठिकाणांचा केंद शासनाकडून ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास केला जाणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाचा आणि मुंबईतील इंदू मिलचा समावेश करण्यात आला आहे. पुणे येथील सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण तर मुंबई, ठाणे, औरंगाबाद व सोलापूर येथील सीसीटीव्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर. कोराडी (जि.नागपूर) येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात १९८० मेगावॅट व चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक हािर मेगावॅट इतक्या क्षमतेचे नवीन वीज निर्मिती संच कार्यरत होणार.

Web Title: Governance committed to redress drought - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.