पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री

By admin | Published: May 23, 2016 04:19 AM2016-05-23T04:19:19+5:302016-05-23T04:19:19+5:30

पर्यटन विकासामुळे विविध बाबींचे आदानप्रदान वाढून भारत व जपानमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी व्यक्त केला

Governance committed for tourism growth - Chief Minister | पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री

पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री

Next

मुंबई : पर्यटन विकासामुळे विविध बाबींचे आदानप्रदान वाढून भारत व जपानमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जपानमधील वाकायामा प्रशासकीय विभागाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे वाकायामाच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन, फलोत्पादन क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, वाकायामाचे व्हॉईस गव्हर्नर हिरोशी सिमो आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपान आणि महाराष्ट्रादरम्यान मैत्रीचे संबंध अधिक दृढ होत आहेत.
जपानने विविध क्षेत्रांत
केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. जपानशी झालेले पर्यटनासंदर्भातील करार यापुढेही चालू ठेवण्यात
येतील. फलोत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. भविष्यात फलोत्पादन क्षेत्रात करार करणे शक्य आहे.
व्हाईस गव्हर्नर हिरोशी सीमो म्हणाले की, पर्यटन विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आठ पर्यटन कंपन्या लवकरच जपानमधील पर्यटनस्थळांची पाहणी करणार आहेत. टोकियोमध्ये जपानी पर्यटन केंद्राला जोडूनच एक भारतीय
पर्यटन कक्ष सुरू आहे. अशा प्रकारचे एक पर्यटन कार्यालय औरंगाबाद
येथे सुरू करण्याचा मानस
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Governance committed for tourism growth - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.