सरकार आणि भाजपाला स्पष्टीकरणाची अखेरची संधी
By Admin | Published: March 17, 2016 01:21 AM2016-03-17T01:21:02+5:302016-03-17T01:21:02+5:30
दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले
मुंबई : दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले व अल्पवयीन मुलांचा समावेशही होता. या प्रकरणी राज्य सरकार व भाजपावर अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना उत्तर देण्यासाठी अखेरची संधी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या दहीहंडीच्या वेळी आयोजकांनी विशेषत: भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आयोजक मंडळांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आणि राज्य सरकारनेही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे स्वाती पाटील यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि राज्य सरकारवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालायत अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या.
गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)