सरकार 'सोनम गुप्ता'पेक्षा बेवफा
By admin | Published: November 16, 2016 08:08 PM2016-11-16T20:08:45+5:302016-11-16T20:22:56+5:30
सरकार काळ्या पैशांच्या नावाखाली सर्व सामान्यांना बॅंकांच्या रांगेत उभे करायचे आणि एकीकडे कर्जबुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींचे कर्ज माफ करते, हा प्रकार म्हणजे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - एकीकडे काळ्या पैशांच्या नावाखाली सर्व सामान्यांना बॅंकांच्या रांगेत उभे करायचे आणि दुसरीकडे कर्जबुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ करायची, या प्रकारामुळे सरकार 'सोनम गुप्ता’पेक्षा मोठी बेवफाई करत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने 63 धनदांडग्या उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. अशा कर्जबुडव्या उद्योगपतींची कर्ज सरकार माफ करते, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही, असा सवाल करत नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येणार असेल, तर या पैशातून शेतक-यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली केली. याचबरोबर सरकारने शेतक-यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा, असेही यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत.