शुभ-अशुभासाठी सरकारचा अटापिटा, १७ चा खतरा नको म्हणून १८ला राज्याचा अर्थसंकल्प

By admin | Published: February 23, 2016 08:34 PM2016-02-23T20:34:31+5:302016-02-23T20:34:31+5:30

१७ चा खतरा नको म्हणून १८ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प राज्य सरकार जाहीर करणार. राज्याचा अर्थसंकल्प १७ मार्चला सादर करण्याचं आजच्या बैठकीत ठरले होते. मात्र १७ चा खतरा टाळून ही तारीख १८ करण्यात आली.

Government budget for the auspicious, not the risk of 17, the state's budget is 18 | शुभ-अशुभासाठी सरकारचा अटापिटा, १७ चा खतरा नको म्हणून १८ला राज्याचा अर्थसंकल्प

शुभ-अशुभासाठी सरकारचा अटापिटा, १७ चा खतरा नको म्हणून १८ला राज्याचा अर्थसंकल्प

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ -  १७ चा खतरा नको म्हणून १८ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प राज्य सरकार जाहीर करणार.  राज्याचा अर्थसंकल्प १७ मार्चला सादर करण्याचं आजच्या बैठकीत ठरले होते. मात्र १७ चा खतरा टाळून ही तारीख १८ करण्यात आली. शुभ-अशुभासाठी सरकारने हा अटापिटा केल्याचे दिसते आहे. 
 
 यासाठी वरीष्ठ मंत्र्यांनी अनोखं लॉजिक लावलं. १८ म्हणजे १ +८= ९ हा शुभ अंक येत असल्याचं मानत, याच तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ठरलेली १७ मार्चची तारीख ऐनवेळी बदलून १८ तारीख निश्चित करण्यात आली.
दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्च ते १३ एप्रिल  यादरम्यान असेल. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

Web Title: Government budget for the auspicious, not the risk of 17, the state's budget is 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.