जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला धारेवर धरा! - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 18:53 IST2018-06-20T18:53:40+5:302018-06-20T18:53:40+5:30
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरा व जनतेला न्याय मिळवून द्या

जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला धारेवर धरा! - अशोक चव्हाण
मुंबई - विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरा व जनतेला न्याय मिळवून द्या अशी सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ समन्वय समितीच्या बैठकीत केली.
आज दुपारी विधानभवनातील काँगरेस पक्ष कार्यालयात काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली. भाजप शिवसेना युतीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये या सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नांवर आक्रमक होऊन अधिवेशनात सरकारला धारेवर धरा व सामान्यांना न्याय मिळवून द्या असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, प्रतोद आ. संजय दत्त, आ. भाई जगताप, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनिल केदार, आ. डी.पी. सावंत, आ. अमर राजूरकर, आ. बसवराज पाटील, आ. चंद्रकांत रघुवंशी, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे समन्वयक संजय खोडके आदी उपस्थित होते.