"जीएसटी"च्या रुपात सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केला - पी चिदंबरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 03:42 PM2017-07-23T15:42:33+5:302017-07-23T15:42:33+5:30
पुणे, दि.23 -जीएसटीच्या रुपात सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केल्याची खरमरीत टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी रविवारी केली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - काश्मीरमध्ये पीपल डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्याने तेथील शांतता चिघळली आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी, मते पूर्णपणे भिन्न आहेत. सामान्य लोकांनी कायदा स्वत:च्या हातात घेतल्याने प्रक्षोभ वाढत चालला आहे. सरकार कोणतेही प्रश्न संयम आणि शांततेने हाताळताना दिसत नाही. जीएसटीच्या रुपात सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केल्याची खरमरीत टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी रविवारी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात चिदंबरम यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा, जीएसटी, रिझर्व्ह बँकेची धोरणे, काश्मीर प्रश्न अशा विविध मुद्दयांवर प्रकाश टाकला.