संजय दत्तला रजा वाढवून देण्यास सरकारचा नकार
By admin | Published: January 10, 2015 11:30 AM2015-01-10T11:30:57+5:302015-01-10T11:35:42+5:30
संचित रजा (फर्लो) वाढवून देण्यात येण्याच्या अर्जावर निर्णय न झाल्याने आणखी दोन दिवस तुरुंगाबाहेर काढणा-या अभिनेता संजय दत्तची रजा वाढवून देण्यास सरकारने नकार दिला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - संचित रजा (फर्लो) वाढवून देण्यात येण्याच्या अर्जावर निर्णय न झाल्याने आणखी दोन दिवस तुरुंगाबाहेर काढणा-या अभिनेता संजय दत्तची रजा वाढवून देण्यास सरकारने नकार दिला आहे. येरवडा तुरूंग प्रशासनासमोर तत्काळ शरण येण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
गुरूवारी संजयच्या फर्लोची मुदत संपली होती, गुरुवारी दुपारपर्यंत तो कारागृहामध्ये हजर होणे अपेक्षित होते. परंतु मुंबईहून सकाळीच पुण्याच्या दिशेने निघालेला संजय दत्त संध्याकाळपर्यंत पुण्यात फिरून वेळ घालवत मुंबईला परतला. तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत त्याने वाढीव रजेसाठी अर्ज केला होता. परंतु त्या अर्जावर निर्णय झाला नसल्याने त्याने आणखी दोन दिवस तुरूंगाबाहेर काढले. या प्रकरणावरून मोठा गदारोळ माजला, सरकारवरही टीकेची झोड उठली होती. अखेर आज सरकारने त्याच्या रजेचा अर्ज फेटाळून लावत त्याला तुरूंगात परतण्याचे आदेश दिले.
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले असून त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला वर्षातून एकदा संचित रजा मिळते. २०१३ साली संजयला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला. २४ डिसेंबर रोजी त्याची १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र या