भाषणाने सरकार चालत नाही- मुकुल वासनिक

By Admin | Published: August 12, 2016 09:39 PM2016-08-12T21:39:51+5:302016-08-12T21:39:51+5:30

विकासाचे व्हिजन दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली

Government does not run the speech - Mukul Wasnik | भाषणाने सरकार चालत नाही- मुकुल वासनिक

भाषणाने सरकार चालत नाही- मुकुल वासनिक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

खामगाव (जि.बुलडाणा), दि. 12 - विकासाचे व्हिजन दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली आहे. देशाच्या उन्नतीसाठी एका वर्षात २ कोटी नोकऱ्या निर्माण करून रोजगार देण्याचे आमिष दाखविले मात्र प्रत्यक्षात २० हजारही नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. देशभर गोरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार होत असताना मोदी स्वत:ला गोळी मारण्याचे भाषण देतात. जनतेने गोळी झेलण्यासाठी नव्हे तर राज्य कारभार चालविण्यासाठी सत्तेवर बसविले आहे. तेव्हा केवळ मोठमोठी भाषणे देवून सरकार चालत नाही तर प्रत्यक्षात जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागते असा घणाघाती टोला अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी लगावला.
खामगाव मतदार संघाचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदीरात काँग्रेसच्यावतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ,माजी आ.दिलीपकुमार सानंदा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मुकुल वासनिक यांनी, मोदी सरकार विकासात्मक कामे न राबविता सुडबुध्दीचे राजकारण करीत आहे. काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंग सरकारने शेतकऱ्यांना ७१ कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. निर्यात दर वाढविला. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहिली. मात्र मोदी सरकार केवळ भुलथापा देवून जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेरीत सरकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेला बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र घटनेला बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस हा डाव कदापिही सहन करणार नाही, असा इशाराही मुकुल वासनिक यांनी यावेळी दिला. तर विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे यांनी अच्छे दिनाच्या नावावर सरकार येवूनही शासनाकडून श्ेतकरी, सर्वसामान्याचे प्रश्न सोडविल्या गेले नाहीत. शेतकरी जनतेच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष नेहमीच धावून गेला असून भविष्यातही जनसामान्यांना न्याय देण्याचे काम काँग्रेसच करू शकते, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. तर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी, केंद्रात अडीच वर्षापासून सत्तेत असणारे मोदी केवळ परदेश दौऱ्यात गुंतले असल्याचा आरोप केला. तसेच यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ बुलडाणा यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास श्यामबाबु उमाळकर, अंजलीताई टापरे, संजय राठोड, विजय अंभोरे, जयश्री शेळके, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा वर्षाताई वनारे, डॉ.तबस्सुम हुसैन, मिनलताई आंबेकर, म.वसिमोद्दीन, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, दिपक काटोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Government does not run the speech - Mukul Wasnik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.