"सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणं उचित नाही"; शासकीय कर्मचारी संघटनेत दोन मतप्रवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:33 PM2022-09-21T13:33:03+5:302022-09-21T13:51:06+5:30
निवृत्तीचे वय 60 वर्षे करा अशी अधिकारी महासंघाने मागणी केलेली असतानाच आता एका अधिकाऱ्याने "सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणं उचित नाही" असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. निवृत्तीचे वय 60 वर्षे करा अशी अधिकारी महासंघाने मागणी केलेली असतानाच आता एका अधिकाऱ्याने "सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणं उचित नाही" असं म्हटलं आहे. तसेच "राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रमाण व त्यांनी शासकीय सेवेचा अल्प संधी व त्यामुळे येणारे नैराश्य पाहता. याप्रमाणे सेवेनिवृत्तीचे वय वाढवणे उचित वाटत नाही" असं म्हटलं आहे.
राज्य सरकारला अधिकाऱ्याने असे पत्र दिले आहे. "सद्य स्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय 58 आहे. सदर वयोमर्यादा 58 ऐवजी 60 करावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रमाण व त्यांनी शासकीय सेवेचा अल्प संधी व त्यामुळे येणारे नैराश्य पाहता. याप्रमाणे सेवेनिवृत्तीचे वय वाढवणे उचित वाटत नाही. त्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय 58 कायम ठेवावे अशी विनंती करतो" असं पत्रात म्हटलं आहे. जलसंपदा विभागाचे सह सचिव सतीश जोंधळे यांनी मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
"सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणं उचित नाही"; शासकीय कर्मचारी संघटनेत दोन मतप्रवाह pic.twitter.com/Xto35sjEqF
— Lokmat (@lokmat) September 21, 2022