सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:57 AM2018-06-14T06:57:51+5:302018-06-14T06:57:51+5:30

राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजीने मारहाण करून जखमी करणाºया व्यक्तीला आता पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकेल.

Government employees will be threatened with imprisonment for five years | सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद

Next

विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजीने मारहाण करून जखमी करणाºया व्यक्तीला आता
पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकेल. सरकारी कर्मचा-यास त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हेतूपुरस्सर मारहाण करून जखमी केल्यास कलम ३३२ नुसार कारवाई केली जाते.
या गुन्ह्यासाठी आधी तीन वर्षांच्या कैदेची तरतूद होती. ती आता वाढवून पाच वर्षे करण्यात आली आहे. तर सरकारी कर्मचाºयावर हल्ला करणे किंवा धाकदपटशा करणे यासाठी कलम ३५३ अन्वये आधी दोन वर्षांच्या कैदेची तरतूद होती. ती देखील आता वाढवून
पाच वर्षे करण्यात आली आहे. राज्य सरकारने या बाबतची अधिसूचना जारी केली आहे.
शासकीय कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजी, मारहाणीच्या होणाºया घटनांना आळा घालण्यासाठी शिक्षेचा कालावधी वाढवून देण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी केली होती. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेत तसे विधेयक विधिमंडळात मांडले आणि ते मंजूर करण्यात आले होते. नंतर ते राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता तशी अधिसूचना काढण्यात आली आहे.

खटले सत्र न्यायालयात
मारहाण आणि दमबाजीचे गुन्हे दखलपात्र करण्यात आले आहेत.
वाढीव शिक्षेची तरतूद केल्यामुळे आता हे खटले दंडाधिकाºयांऐवजी सत्र न्यायालयात चालतील.
अशा खटल्यांचा निकाल किती कालावधीत लावावा याची कालमर्यादा घालून देण्यात आलेली नव्हती. आता आरोपपत्र दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत न्यायालयाला निकाल द्यावा लागणार आहे.
शासकीय कर्मचाºयांना मारहाणीच्या होणाºया घटनांना आळा घालण्यासाठी शिक्षेचा कालावधी वाढविण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती.

Web Title: Government employees will be threatened with imprisonment for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.