सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे, धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 05:46 PM2018-07-16T17:46:03+5:302018-07-16T17:47:02+5:30
राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
नागपूर : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
शेतकरी दुध काढतो, त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे गब्बर झाले अशी भाषणे सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या सभेत केली होती त्याची आठवण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी करुन दिली. शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे, सरकार बैठका घेत आहे पण शेतक-यांना हे मान्य नाही, किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार आहेत असा सवाल त्यांना केला. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे राहिले असतानाच सभागृहात ‘भाव द्या, भाव द्या, सदाभाऊ भाव द्या’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी कामकाज सभापतींनी तहकूब केले.
दरम्यान कामकाज तहकुब करण्यापूर्वी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा गंभीर विषय असल्यामुळे २८९ प्रस्तावावर ९७ ची चर्चा मंगळवारी किंवा बुधवारी घेण्याचे जाहीर केले.