६६० मेगावॅट प्रकल्पाबाबत शासन सकारात्मक
By admin | Published: May 13, 2016 04:50 AM2016-05-13T04:50:39+5:302016-05-13T04:50:39+5:30
नाशिक एकलहरे येथील ६६० मेगावॅट प्रकल्पासंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून हा प्रक्लप मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुंबई : नाशिक एकलहरे येथील ६६० मेगावॅट प्रकल्पासंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून हा प्रक्लप मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नाशिक येथील औष्णिक विद्युत केंद्राला दिलेल्या भेटीवेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. वीज उत्पादन प्रक्रियेतील विविध विभागांची त्यांनी यावेळी पाहणी केली. शिवाय महानिर्मितीच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, कंत्राटी कामगार प्रतिनिधी, कंत्राटदार प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिवाय वीज क्षेत्राची वर्तमान परिस्थिती, आगामी काळातील वाटचाल आणि ६६० मेगावॅट नाशिक वीज प्रकल्पाच्या विविध बाजूंवर चर्चा करत याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे बावनकुळे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)