आॅस्करवारीसाठी ‘कोर्ट’ला सरकारची मदत
By admin | Published: October 10, 2015 03:10 AM2015-10-10T03:10:09+5:302015-10-10T03:10:09+5:30
आॅस्करवारीसाठी निवडल्या गेलेल्या ‘कोर्ट ’ या मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
मुंबई : आॅस्करवारीसाठी निवडल्या गेलेल्या ‘कोर्ट ’ या मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
‘ बेस्ट फॉरिन लॅग्वेज’ या कॅटेगरीमध्ये भारतासह एकूण ८० देशांचे सिनेमे निवडण्यात आले आहेत. त्यात भारताकडून चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी सिनेमाची शिफारस करण्यात आली आहे. आॅस्करसाठी (बेस्ट फॉरिन लॅग्वेज) या सिनेमाची शिफारस होणे ही सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. त्यामुळे ‘कोर्ट ’ सिनेमाचे लॉस एजंलिस इथे प्रमोशन कसे करता येईल याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांनी कोर्ट च्या टीमबरोबर शुक्रवारी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी कोर्ट सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते विवेक गोम्बर, सिनेमाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे या सिनेमात सरकारी वकिलाची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली कुलकर्णी, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होते. (विश्ोष प्रतिनिधी)