रसायनीत सरकारी रुग्णालयाची मागणी
By admin | Published: August 25, 2016 02:59 AM2016-08-25T02:59:28+5:302016-08-25T02:59:28+5:30
लोकसंख्या पाहता येथील बाजारपेठेचे केंद्रबिंदू असणाऱ्या मोहोपाडा शहरात सरकारी रुग्णालयाची नितांत गरज असल्याने ते उभारण्यात यावे
मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसराची वाढती लोकसंख्या पाहता येथील बाजारपेठेचे केंद्रबिंदू असणाऱ्या मोहोपाडा शहरात सरकारी रुग्णालयाची नितांत गरज असल्याने ते उभारण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.
रसायनी परिसरातील लोकसंख्या पाहता सध्या असणारे खाजगी दवाखाने अपुरे पडत आहेत व त्यांच्याकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. नाईलाजाने रसायनी परिसरातील रुग्णांना जवळच असणाऱ्या दवाखान्यात जावे लागते. परिसरातील गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र आहेत परंतु तेथे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. रसायनी पाताळगंगा ही सन २०२० मध्ये राज्याची सर्वात मोठी औद्योगिक नगरी होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यावेळी वाढणारी लोकवस्ती पाहता परिसरात मध्यवर्ती ठिकाणी एखादे सुसज्य शासकीय रूग्णालय झाल्यास परिसरातील रूग्णांची सोय होणार आहे. याकरिता समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी पत्रव्यवहार सुरू केला असून लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनीही रसायनी परिसरात सरकारी रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी
के ली आहे.(वार्ताहर)