सोयाबीन उत्पादक शेतक-यांबाबत शासनाची चालढकल

By admin | Published: October 31, 2016 11:25 PM2016-10-31T23:25:54+5:302016-10-31T23:25:54+5:30

सोयाबीनची विक्री ठप्प; हमी दर मिळणे झाले दुरापास्त!

Government Movement for Soybean Growers | सोयाबीन उत्पादक शेतक-यांबाबत शासनाची चालढकल

सोयाबीन उत्पादक शेतक-यांबाबत शासनाची चालढकल

Next

सुनील काकडे
वाशिम, दि. ३१-अहोरात्र कष्ट करूनही सोयाबीनला अगदीच निच्चांकी दर मिळत असल्याने आर्थिक परिस्थितीसमोर हतबल झालेल्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप सोयाबीन खरेदीची तारीख जाहीर केली नाही. मात्र लवकरच हमी भावाने खरेदी सुरू केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. यामुळे शासनाची सोयाबीन शेतकर्‍यांबाबत चालढकल करण्याची भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
कधीकाळी पांढर्‍या सोन्याचा (कपाशी) प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमधून सोयाबीनचा सर्वाधिक पेरा कमी होत आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सोयाबीनच्या पेर्‍याने व्यापले होते. प्रारंभी चांगला पाऊस, मध्यंतरी प्रदीर्घ उघाड अन् त्यानंतर अतवृष्टीसम बरसलेल्या पावसाचा धैर्याने सामना करीत यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनचे रक्षण केले. साधारणत: १५ दिवसांपूर्वी सोयाबीनची सोंगणी होऊन माल बाजार समित्यांमध्ये पोहोचायला लागला; तोवर सोयाबीनचे दर मात्र प्रचंड प्रमाणात गडगडले होते.
अशातच सोयाबीनला शासनाने २ हजार ७७५ रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप कुठेच सुरू झालेली नाही. ह्यनाफेडह्णच्या वतीने कुठेही सोयाबीन खरेदी केंद्र उघडण्यात आलेले नाही. असे असताना जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अवलंबिला आहे. २९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार, लवकरच सोयाबीनची खरेदी केली जाईल, ह्यनाफेडह्णमार्फत लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र उघडले जातील; मात्र २९ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत सर्वच ठिकाणच्या बाजार समित्या बंद असल्याने जिल्हा प्रशासनाची ही उठाठेव सध्यातरी निर्थक ठरल्याचा सूर संतप्त शेतकर्‍यांमधून उमटत आहे.
बाजार समित्या बंद असताना कशी होणार आश्‍वासनांची पूर्तता?
राजकीय नेत्यांप्रमाणेच पोकळ आश्‍वासन देत असताना २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, असे पाच दिवस बाजार समित्या बंद राहणार असल्याचा जिल्हा प्रशासनाला सपशेल विसर पडला. ऐन दिवाळी, भाऊबीज यासारख्या मोठय़ा सणांदरम्यान निच्चांकी दर मिळण्यासोबतच सोयाबीनची विक्री करणे अशक्य होत असल्याने शेतकर्‍यांची सद्य:स्थिती मात्र अत्यंत दयनिय झाली आहे.

Web Title: Government Movement for Soybean Growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.