गणेशोत्सव मंडळांसाठी आता सरकारची बक्षिसे

By admin | Published: August 26, 2016 04:21 AM2016-08-26T04:21:19+5:302016-08-26T04:21:19+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार असून, उत्कृष्ट गणेश मंडळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Government prizes now for Ganeshotsav boards | गणेशोत्सव मंडळांसाठी आता सरकारची बक्षिसे

गणेशोत्सव मंडळांसाठी आता सरकारची बक्षिसे

Next


मुंबई : राज्य शासनातर्फे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार असून, उत्कृष्ट गणेश मंडळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठीची तारीख आता ४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अभियान समितीचे अध्यक्ष व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई, पुणे, ठाणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ही माहिती दिली.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या उद्देशाकडे पुन्हा एकदा वाटचाल करण्यासाठी हे अभियान असेल.
या अभियानांतर्गत विभागीयस्तर प्रथम पारितोषिक २ लाख रु. द्वितीय पारितोषिक १ लाख ५० हजार, तर तृतीय पारितोषिक १ लाख रुपये राहील. जिल्हास्तर प्रथम पारितोषिक १ लाख, द्वितीय पारितोषिक ७५ हजार आणि तृतीय पारितोषिक ५० हजार रु पये असेल. तालुकास्तर प्रथम पारितोषिक २५ हजार, द्वितीय पारितोषिक १५ हजार आणि तृतीय पारितोषिक १० हजार रुपये इतके राहील.
बृहन्मुंबई सार्वजनिक मंडळांची संख्या लक्षात घेता मुंबई आणि उपनगर जिल्ह्यांना कोकण विभागातून वगळून या दोन जिल्ह्यांचा स्वतंत्र विभाग समजून पारितोषिक दिले जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Government prizes now for Ganeshotsav boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.