सरकार ‘संघ दक्ष’; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही!
By admin | Published: January 10, 2016 01:06 AM2016-01-10T01:06:02+5:302016-01-10T01:06:02+5:30
पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून
मुंबई : पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून येत नाही. हे सरकार ‘संघ दक्ष’ आहे; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, भाई जगताप आणि सतेज पाटील यांचा टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्र मात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणकिराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बिहार, मध्य प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकींचे निकाल भाजपसाठी प्रतिकूल आहेत. दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे जनतेत भाजपविरोधी वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ घ्यायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन या सरकारची वस्तुस्थिती लोकांसमोर उघड करा. मागील वर्षभरात महाराष्ट्र कसा अधोगतीकडे गेला, हे लोकांच्या निदर्शनास आणून द्या. ही जबाबदारी व्यविस्थतपणे पार पाडली तर ‘अच्छे दिन’ आणण्याचे खरी ताकद भाजपमध्ये नव्हे तर काँग्रेसमध्येच असल्याची जनभावना निर्माण होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
परंतु काँग्रेस पक्ष आक्र मकपणे सरकारविरूद्ध संघर्ष करीत राहील. तीनही सत्कारमूर्ती अमरीश पटेल, भाई जगताप व सतेज पाटील यांनी देखील सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे संचालन प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी केले.