सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार

By admin | Published: May 28, 2017 08:21 PM2017-05-28T20:21:35+5:302017-05-28T22:45:14+5:30

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

Government should give debt relief or get the price for the farm - Sharad Pawar | सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 28 - सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  ते म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करावी, मतभेद विसरून एकत्र यावे, तर शेतक-याला न्याय मिळेल, बळीराजाचे हित जपण्यासाठी जागे राहिले पाहिजे. एकतर शेतमालाला किंमत द्या नाही तर कर्जमाफी द्या, महाराष्ट्राचा अन् देशाचा बळीराजा उद्ध्वस्त झाला तर देश मजबूत होणार नाही, शेतकरी हे राज्य अन् देश चालवत आला आहे, असंही पवार म्हणाले आहेत.

महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या नेतृत्वाचे स्वप्न बघितले नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श माझ्यासमोर होता. त्यांच्या उद्याच्या महाराष्ट्राची भूमिका मला भावली. महाराष्ट्राने मला भरभरून दिले, मात्र त्यातही नाशिककरांचा मोठा वाटा आहे. देशाच्या संसदेत महाराष्ट्राची संख्या वाढू शकलो नाही, हे मान्य करतो.  वास्तवतेचे भान ठेवून राजकीय वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच पाय जमिनीवर ठेवणे पसंत केले. सोन्याच्या साखळ्या अन् अंगठ्या घालणाऱ्या पुढा-यांपासून मी नेहमीच लांब राहतो. मुंबईचे डबेवाले हे जास्त करून नाशिकचे, हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसं माझी आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो.



खेळाडू आणि त्यांच्या सुविधा ही माझी जबाबदारी मी मानली. मुंबई क्रिकेट क्लबला कर्जमुक्त करून मी पद सोडले. ब्रॅडमन यांच्या विक्रमापेक्षा भाऊसाहेब निंबाळकर यांनी केवळ तीन धावा कमी काढल्या. त्यांना 50 हजार रुपये पेन्शन सुरू केली. जुन्या खेळाडूंना प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला. भारतीय क्रिकेट क्लबने 50 कोटी भारतीय खेळांच्या विकासासाठी खेळ मंत्रालयाकडे दिले. लातूरचा भूकंप हा मोठा धक्का, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, झोप सोडली, पहाटे निघालो, सकाळी किल्लारी लातूरला गाठले, अंत्यसंस्कार अडचणीत आले, मुसळधार पाऊस सुरू झाला होता, तो काळ मोठा आव्हानात्मक होता. त्यावेळी पाच हजार माणसे त्या जिल्ह्यात मृत्युमुखी पडली होती. ते आठवले तरी अंगावर शहारा येतो. मुख्यमंत्री असताना 1993 साली एअर इंडियाच्या इमारतीत बॉम्ब फुटला. त्यावेळी मी तेथे पोहोचलो, आरडीएक्स देशात पुण्याच्या खडकीमध्ये तयार होते, आरडीएक्स कराचीतून आल्याचे लक्षात आले, त्यावेळी 12 ठिकाणी बॉम्ब पडले असे सांगितले. 12वे ठिकाण मुहम्मदअली रोडचे होते, दंगल टळली, 11 ठिकाणी बॉम्ब पडले होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येत नाही हा आपला पराभव आहे असे मानले, तीन वर्षांनंतर मी आंबेडकर यांचे नाव दिले, असंही पवार यांनी सांगितलं आहे. 

Web Title: Government should give debt relief or get the price for the farm - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.