रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पोचालक वाहतूक संघटनेला सरकारने मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:52 PM2020-03-27T13:52:41+5:302020-03-27T13:52:52+5:30
कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे.
मुंबई: मुंबई राज्याची ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई शहरात जवळपास दोन कोटी इतकी लोकसंख्या मुंबई महानगरीत राहते. संपूर्ण देश व मुंबई लॉक डाउन करणे म्हणजे दोन कोटी लोकसंख्येला घरी थांबायला लावणे. कोरोनामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुंबई शहरामध्ये 35000 काळीपिवळी टॅक्सी, 65000 खाजगी एसी टॅक्सी हे सर्व बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच खासगी बसेस टेम्पो वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या सर्व वाहतूक दारांचे हातावर पोट असल्यामुळे दिवसभर धंदा केला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालक वाहतूक संघटनेला राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.
दिवसभर मुंबई शहरांत टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक मालक व खासगी बसेस यांनी जर काही काम धंदा केला तरच त्यांच्या घरची चूल पेटवू शकते. या सर्व लोकांचे हातावर पोट असल्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे बँकेचे कर्ज असते त्याच बरोबर इतर काही खर्च असतात. तरी यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाययोजना करून रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालकांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे विषद केली.