सरकारने मानधनवाढीचे आश्वासन पाळावे! अंगणवाडी कर्मचा-यांची राज्यभर निदर्शने

By admin | Published: July 10, 2017 08:45 PM2017-07-10T20:45:43+5:302017-07-10T20:45:43+5:30

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या देशव्यापी मागणी दिवसानिमित्त सोमवारी अंगणवाडी कर्मचा-यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने केली.

Government should reassure the increase in dearness! State demonstrations of Anganwadi workers | सरकारने मानधनवाढीचे आश्वासन पाळावे! अंगणवाडी कर्मचा-यांची राज्यभर निदर्शने

सरकारने मानधनवाढीचे आश्वासन पाळावे! अंगणवाडी कर्मचा-यांची राज्यभर निदर्शने

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या देशव्यापी मागणी दिवसानिमित्त सोमवारी अंगणवाडी कर्मचाºयांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने केली. अंगणवाडी कर्मचाºयांना दिलेले मानधनवाढीचे आश्वासन सरकारने पाळावे, म्हणून अंगणवाडी कर्मचा-यांनी मुंबई, पुणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर याठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येत सरकारविरोधात रोष
व्यक्त केला.
संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी सांगितले की, कृती समितीच्या व मानधनवाढ समितीच्या शिफारशीनुसार सरकारने अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ मंजूर करावी. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळत असल्याचे संघटनेने वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. सरकारनेही इतर राज्यांतील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाचा अभ्यास केलेला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत येथील कर्मचारी अधिक काम करत असूनही कमी मानधन मिळत असल्याची खंत शमीम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
आयसीडीएस योजना कायम करून तिचा दर्जा सुधारण्याची कर्मचाºयांची प्रमुख मागणी आहे. शिवाय अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. सोबतच शासनाने टीएचआर (टेक होम रेशन)
बंद करून सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजवलेला आहार द्यावा. मुले टीएचआर खात नसून फेकून देत असल्याचे कित्येक वेळा समितीने सिद्ध करून दाखवले आहे. तरीही शासनाने टीएचआरचा बालहट्ट सोडून मुलांना ताजा शिजवलेला आहार देण्याचे आवाहन समितीने केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंगणवाडीत दोन वेळच्या आहारासाठी सध्या प्रतिविद्यार्थी फक्त ४ रुपये ९२ पैसे इतका निधी
खर्च केला जात असून हा दर अपुरा आहे. तरी या दरात तिपटीने वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Government should reassure the increase in dearness! State demonstrations of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.