शासनाने ‘सनातन’ऐवजी देशाला वाचवावे - कवाडे
By admin | Published: October 5, 2015 03:08 AM2015-10-05T03:08:52+5:302015-10-05T03:08:52+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य सरकारने निष्पक्षपणे करावा
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य सरकारने निष्पक्षपणे करावा, अशी मागणी करत सरकारने ‘सनातन’ला वाचविण्याऐवजी देशाला वाचवावे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
प्रा. कवाडे म्हणाले, बहुसंख्याकांचा आतंकवाद देशाला विघटनाकडे नेणारा आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयाची सुई ‘सनातन’कडे आहे. सरकारने सैतानी कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करू नये. काही प्रतिगामी शक्तींकडून त्यांना वाचविण्याचा आटापिटा सुरू आहे, हे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)