‘सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी’
By admin | Published: May 5, 2015 01:05 AM2015-05-05T01:05:25+5:302015-05-05T01:05:25+5:30
समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी
अहमदनगर : समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले़
अंनिस व समविचारी संस्था आणि संघटनांतर्फे रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयात आयोजित सामाजिक न्याय संकल्पना स्पष्टता कार्यशाळेचा सोमवारी समारोप झाला़ पाटील म्हणाले, सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विकसित होण्याची समान संधी़ पुरोगामी पक्ष, संस्था व संघटनांना बरोबर घेऊन नगर जिल्ह्यात पुढील तीन वर्षे प्रबोधन मोहीम राबवून सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे़संविधानातील मूल्ये, स्त्री-पुुरुष समानता रुजविण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़
समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे रचनात्मक कार्य असून, यासाठी प्रसंगी संघर्षही करावा लागेल, असे ते म्हणाले़ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे म्हणाले, समाजाच्या धार्मिक जीवनात बदल घडवून आणावयाचा असेल तर कालसुसंगतपणे काम करावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)