मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात : तटकरे
By admin | Published: September 20, 2016 07:20 PM2016-09-20T19:20:52+5:302016-09-20T19:20:52+5:30
मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २० : मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे. मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे, असे व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे पंढरपूर येथे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी सकाळी येथे आले होते. या वेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुढे तटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोध आजपर्यंत विरोध करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडी झाली नाही.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी करण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेंव्हा ते कराडला निघून गेले होते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची यादी आम्ही नाईलाजाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. आता मात्र आघाडी तोडल्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जाते हे चुकीचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ राष्ट्रवादीला विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका तटकरे यांनी केली
अच्छे दिन कुठे गेले
राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते पंढरपूर मध्ये बोलत होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहे. सरकारचा धाक कमी झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ह्यअच्छे दिन कुठे गेलेह्ण असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.
चव्हाणांना तटकरेंचा टोला
कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केले होते. या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि , मागे एकदा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी लागली असती या मध्ये आमचा पक्ष संपला असता असे वक्तव्य केले होते. याची आठवण त्यांनी ठेवावी असा टोला तटकरे यांनी चव्हाण यांना लगावला.
आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरु
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नियोजन विस्कळीत झाले होते. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही धोरण ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानरगापलिका, नगरपालिका निवडणुकीच काम सुरु आहे