राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च, शासकीय डॉक्टरांना ३ टक्के बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:28 AM2017-09-10T01:28:25+5:302017-09-10T01:28:46+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च झाले. या योजनेत सहभागी असलेल्या खासगी इस्पितळांना यातील सुमारे ८३ टक्क्यांपेक्षा जास्त निधी मिळाला.
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च झाले. या योजनेत सहभागी असलेल्या खासगी इस्पितळांना यातील सुमारे ८३ टक्क्यांपेक्षा जास्त निधी मिळाला. विशेष म्हणजे, या योजनेतील विमा कंपनीकडून मिळणाºया निधीतून शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरला ३ टक्के बोनस देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मेडिकलमध्ये बोन मॅरो रजिस्ट्रीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले असताना गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समितीने केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील वैद्याकीय संस्थेचा अभ्यास केला. तिथे विविध योजनांतर्गत शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरांना वेतनाशिवाय इतरही आर्थिक लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर मेडिकलच्या डॉक्टरांना देण्याचा विचार सुरू आहे.