सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु

By admin | Published: August 30, 2016 04:41 PM2016-08-30T16:41:22+5:302016-08-30T16:41:22+5:30

मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीत असलेल्या कलमवाडी येथील कुपोषित बालक सागर शिवा वाघ या कुपोषित बालकाचा आज पहाटे मृत्यु झाला

Government is a victim of unrest; Death of malnutrition by Sagar Tiger of Mokhada | सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु

सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु

Next
>- रविंद्र साळवे / ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. 30 - तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीत असलेल्या कलमवाडी येथील कुपोषित बालक सागर शिवा वाघ या कुपोषित बालकाचा आज पहाटे मृत्यु झाला.त्याला काल दुपारी नाशिक सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. गेले चार महिने तो मृत्यूशी झुंजत होता. सरकारने बाल ग्राम विकास केंद्र बंद केल्यानंतर कुपोषित बालकांसाठी कोणतीही योजना सुरु ठेवली नसल्याने सागरच्या उपचारासाठी कोणताही पर्याय त्याच्या कुटुंबीयांकडे शिल्लक नव्हता. सरकारच्या अनास्थेने सागर चा बळी घेतला आहे,याबाबत सर्वत्र तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 
 
सरकारच्या निर्दयी आणि संवेदशील मानसिकतेने सागरची हत्याच केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे.
 
१४ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्र सरकार ने राज्याला पत्र पाठवून निधी अभावी ग्राम बाल विकास केंद्र (VCDC)  बंद करायचे निर्देश दिले होते. याच पात्राच्या आधारावर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून हे केंद्र बंद करून कुपोषित बालकांची क्रूर थट्टाच केली होती. विशेष म्हणजे केंद्रचा निधी बंद झाला तर राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या केंद्रांना निधी देऊन हि योजना पूर्ववत करणे अभिप्रेत होते मात्र तसे झाले नाही. यानंतर श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलन करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. 
 
सरकारची संवेदना जागृत होत नाही असे लक्षात आल्याने विवेक पंडित यांनी पुढाकार घेऊन श्रमजीवी, विधायक संसद आणि श्री.विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून १ जानेवरी २०१६ रोजी जव्हार येथे एका खाजगी फार्म मध्ये कुपोषित बालकांसासाठी " बाल संजीवन छावणी" सुरु करण्यात आली. याठिकाणी दानशूर दात्यांच्या मदतीने कुपोषित बालकांना दाखल करून उपचार दिले गेले. पहिल्याच महिन्यात याठिकाणी ३२ मुलांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यात आले होते. सागर वाघ हा १ जानेवारी रोजी छावणीत दाखल झाला होता तेव्हा त्याचे वजन केवळ ४ कि. ६०० ग्रा होते. त्याला त्याच्या आईसह छावणीत दाखल करून उपचार दिले . त्यानंतर त्याचे 10 दिवसातच ६०० ग्राम वजन वाढले. त्यानंतर सतत उपचाराने तो सदृढ बनत चालला होता. याच दरम्यान सागरच्या आईला छावणीत असतानाच मुलगी झाली. सागर च्या आईलाही छावणीत पोषक आहार मिळाल्या कारणाने ती मुलगी सदृढ जन्माला आली. मार्च २०१६ मध्ये सरकारला उपरती सुचली आणि ग्राम बाल विकास केंद्रासाठी (VCDC) साठी जव्हार मोखाडा तालुक्याला निधी आल्याचे सांगत केंद्र सुरू केली. आता केंद्र सुरू झाली म्हणून केंद्रांना पर्याय म्हणून सुरु केलेली छावणी काही दिवसांनी बंद करण्यात आली. सरकारची केंद्र काही दिवस चालली आणि परत जैसे थे झाले. केंद्र बंद झाली आणि सागरच्या उपचाराचा ,पोषक आहाराचा पुन्हा प्रश्न पडला. राज्याच्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मोठ्या समारंभात थाटात अमृत आहार योजना दोन वेळा उदघाटन करून सुरु केल्याचे भासवले. प्रत्यक्षात आजही ती योजना फक्त कागदावर आहे. विशेष म्हणजे गारोदर मतांसाठी असलेल्या या योजनेची आता कुपोषित असलेल्या बालकांसाठी काय तरतूद आहे हा प्रश्न आहे. 
 
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने सागरच्या पालकांनाही त्यासाठी काही कारणे शक्य नव्हते. काल अत्यवस्थ झाल्यावर त्याला जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त खालावली आणि जव्हार हुन नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला नेण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
कुपोषित बालकांसाठी प्रधान्याने सतत काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे सांस्थापक विवेक पंडित यांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला. हे सरकार अत्यंत क्रूर असून आदिवासींच्या ,गरिबांच्या जीवाशी खेळणारे सरकार आहे. सागरचा मृत्यू नाही तर ती सरकारचे असंवेदनशील धोरण आणि निर्दयी मानसिकतेने केलेली हत्याच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विवेक पंडित यांनी दिली.
 

Web Title: Government is a victim of unrest; Death of malnutrition by Sagar Tiger of Mokhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.