ओला, उबर टॅक्सीचा रंग आणि भाडे ठरवणार सरकार
By admin | Published: March 4, 2017 04:48 PM2017-03-04T16:48:46+5:302017-03-04T16:50:35+5:30
महाराष्ट्र सरकारने अॅपवर चालणा-या टॅक्सी सेवांना 'महाराष्ट्र सीटी टॅक्सी नियम 2017' लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - महाराष्ट्र सरकारने अॅपवर चालणा-या टॅक्सी सेवांना 'महाराष्ट्र सीटी टॅक्सी नियम 2017' लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ओला, उबर या अॅप आधारीतखासगी टॅक्सी सेवा सरकारची नियमांच्या कक्षेत येणार आहे.
त्यामुळे कमाल आणि किमान भाड किती असाव हे सरकार निश्चित करणार असून टॅक्सीचा रंग काय असावा हे सुद्धा सरकारचं ठरवणार आहे. काळया-पिवळया टॅक्सी चालकांच्या मुजोरीमुळे नागरीकांची अॅप बेस टॅक्सी सेवांना पहिली पसंती असते. पण आता ओला, उबर टॅक्सी सेवेला सरकारी नियम लागू होणार आहेत.