...आता जे घडेल-बिघडेल त्यास सरकार जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:04 AM2018-06-30T06:04:57+5:302018-06-30T06:05:00+5:30

आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तु

... the government will be responsible for what is going to happen now! | ...आता जे घडेल-बिघडेल त्यास सरकार जबाबदार!

...आता जे घडेल-बिघडेल त्यास सरकार जबाबदार!

Next

तुळजापूर (जि़ उस्मानाबाद) : आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पाहाच. आता जे घडेल बिघडेल त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, अशा शब्दांत मराठा समाजाने शुक्रवारी तुळजाभवानीच्या साक्षीने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला़
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसदर्भात आंदोलनाचे दुसरे पर्व शुक्रवारी सुरू करण्यात आले आहे़ सकाळी ११़३० वाजता मोर्चेकऱ्यांनी येथील शिवरायांच्या अन् शंभुराजेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली़ तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या महाद्वारावर पोहोचल्यानंतर जागरण-गोंधळ घालण्यात आला़
आबासाहेब पाटील, नानासाहेब जावळे, रमेश केरे-पाटील, सुनील नागणे, जीवनराजे इंगळे या पाच प्रमुख वक्त्यांनी मोर्चाला संबोधित करताना आंदोलनाची पुढील दिशा व भूमिका विशद केली़ मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन् शेतकºयांना संरक्षण या प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातही बदल करण्याची मागणी करण्यात आली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करीत आहेत़ १० महिने उलटले तरी त्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही़ एकही जीआर काढण्यात आलेला नाही़ ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे़ त्यामुळे शिवरायांनी स्वराज्यासाठी जी गनिमी काव्याची नीती वापरली होती, त्याच नीतीने पुढची आंदोलने होतील़ त्यात जे काही घडेल-बिघडेल त्यास पूर्णपणे सरकारच जबाबदार राहील़ आरक्षण हा आमचा हक्क आहे़ तो घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही़ मराठ्यांच्या जिवावर मोठे झालेल्या नेत्यांनाही आता इंगा दाखवू, अशा तीव्र शब्दांत वक्त्यांनी सरकारला अन् नेत्यांना इशारा दिला़ सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले़ आभार सज्जनराव साळुंके यांनी मानले़
मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करीत दुपारी २ वाजता आंदोलनाची सांगता झाली. मूकमोर्चांप्रमाणेच हाही मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडला़ त्यास मुस्लीम समाजानेही पाठिंबा दर्शवून ठिकठिकाणी पाण्याचे वाटप केले़

भवानीमातेला साकडे
मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी मार्चेकºयांच्या वतीने तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले़ झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करून, सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करण्यात आली़संबळ, घोषणांचा निनाद
संबळाचा निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात युवक शिवरायांचा जयघोष करीत होते़ तसेच ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ, सदानंदाचा उदोऽऽ उदोऽऽऽ, एक मराठा लाख मराठा’ आदी घोषणा देत मोर्चेकºयांनी तुळजापूर नगरी दणाणून सोडली़

Web Title: ... the government will be responsible for what is going to happen now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.