सरकार मला मरू देणार नाही; अण्णांचा उपोषणाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:27 AM2019-01-28T06:27:13+5:302019-01-28T06:27:28+5:30
30 जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषण करणार
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारची मला मरू देण्याची हिंमत नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली तर जनतेला अधिकार मिळतील. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल. जे सरकार कायद्याचे पालन करीत नाही. कृषी प्रधान देशात शेतकºयांच्या हिताचे, जनहिताचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असेल, तर अशा सरकारला पराभूत करणे हीच खरी लोकशाही आहे, असे मत व्यक्त त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महात्मा गांधी पुण्यतिथीपासून अण्णा उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे प्रजासत्ताकदिनी शनिवारी रात्री झालेल्या
ग्रामसभेत त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रभावती पठारे होत्या. अण्णांचे वय ८१ आहे. त्यातच त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. वाढत्या वयाने येणारे आजार पाहता ग्रामसभेत अण्णांच्या तब्येतीविषयी राळेगणसिद्धी परिवाराने काळजी व्यक्त केली.