सरकारचे ९२.६३ कोटी पाण्यात

By admin | Published: August 26, 2015 01:09 AM2015-08-26T01:09:18+5:302015-08-26T01:09:18+5:30

बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन

In the government's 9 2.63 crore water | सरकारचे ९२.६३ कोटी पाण्यात

सरकारचे ९२.६३ कोटी पाण्यात

Next

ठाणे : बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन घोटाळ््याच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. भागीदारी निवृत्ती करारात उणिवा असताना आणि टर्नओव्हरच्या अटींची पूर्तता होत नसतानाही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून हे कंत्राट मिळून दिल्याचे आणि निविदा प्रक्रियेचे नियमही धाब्यावर बसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
राज्य सरकारच्या या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे एसीबीने विशेष चौकशी पथक स्थापन करून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्पांची चौकशी सुरू केली होती. याचदरम्यान या धरणाचे कंत्राटदार मेसर्स एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व त्यांच्या कुटुंबीय दिल्याते निदर्शनास आले. यात जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीत एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मकरीत्या झाल्या असल्याचे भासवले. आर. एन. नायक आणि सन्स, हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचे दर्शवण्यात आले. त्यासाठी त्यांनी आर. एन. नायक अ‍ॅण्ड सन्सच्या नावाने बनावट निवीदा भरणे, या कंपनीसाठी एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यातून २५ लाखांचा इसाराच्या रकमेचा डिमांड ड्रफ्ट देणे, बनावट लेटरहेड्स तसेच बनावट निविदेसाठी १ कोटी ५२ लाखांची बनावट बँक गॅरेंटी
बनविणे असे प्रकार केले. हे करताना बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवण्यात आले. टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेऊन केआयडीसीची आणि शासनाची फसवणूक करण्यात आली. याला एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री, निसार फतेह मोहम्मद खत्री, जैतून खत्री, अबीद खत्री, जाहीद
खत्री जबाबदार असल्याचा दावा
करीत एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यानुसार आता दोषी सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार निसार खत्री, त्यांचे कुटुंबीय यांच्या घर
तसेच कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात झाली आहे. उपाधीक्षक सुनील कलगुटकर हे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सुनील तटकरे यांच्यापाठोपाठ माजी जलसंपदा मंत्री व आमदार अजित पवार यांनीही मंगळवारी चौकशीला दांडी मारली. पवार यांनाही शनिवारी ठाणे लाचलुचपत विभागाने ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होत; मात्र ते हजर राहिले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: In the government's 9 2.63 crore water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.